
वाळूज महानगर (ता.8) – एमआयडीसी अंधेरी (पुर्व), मुंबई पोलीस ठाण्याच्या कस्टडीतून पळुन गेलेल्या एका महिला आरोपीस व तीच्या इतर तीन महिला साथिदारांना वाळुज पोलीसांनी शिवराई येथील ईस्टवेस्ट कंपनी समोरील मोकळ्या जागेतून जेरबंद करून मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई शनिवारी आठ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशन अंधेरी (पुर्व), मुंबई येथे दाखल असलेल्या कलम 305 (अ), 3(5) बीएनएस मधील महिला आरोपी दिव्या रवी काळे (वय 32 वर्ष) रा.शिंदी शिरसगाव हीस सहा नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. परंतु ती पोलीस कस्टडीमधुन पळुन गेल्याने तीच्यावर कलम 262 बीएनएस अन्वये शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

ही महिला पळुन वाळुज भागातील शिवराई येथे लपलेली असल्याची खात्रीलायक माहिती वाळुज पोलीसांना मिळाल्याने वाळुज पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाणे अंधेरी (पुर्व), मुंबई पोलिसांनी शिवराई भागात शोध घेतला असता, आरोपी दिव्या रवी काळे ही ईस्टवेस्ट कंपनी समोरील एका मोकळया शेतात मिळुन आली. तिला जेरबंद करून तीच्या साथिदार माहिला बाबत चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली देत तिच्या साथीदार महिला आरोपी अश्विनी पोपट पवार (वय 40 वर्ष) रा. शिवराई, वाळुज, अर्चना रामा काळे (वय 45 वर्ष) रा. अविनाश कॉलनी, वाळुज, सीमा जॉन्सन पवार (वय 20 वर्ष) रा. शिवराई, हनुमान मंदिर रोड, वाळुज, ता. गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी नावे सांगितली. त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.
यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, संदिप वाघ, पो.अं. विजय पिंपळे, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, पोलीस मित्र अमन शेख, किशोर गाडेकर यांनी केली.
