
वाळूजमहानगर, (ता.26) – अवैध गॅस रिफिलिंग, अवैध दारू साठा या कारवाईनंतर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पंढरपूर येथील कुंटणखाण्यावर छापा टाकून पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शनिवारी (ता.25) रोजी सायंकाळी आणखी एक धडाकेबाज कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, होटल साई कृपा लॉजिंग अँड बोर्डिंग, तिरंगा चौक पंढरपूर येथे कुंटणखाना सुरु असल्याची माहिती उपायुक्त नितीन बगाटे यांना मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने कुंटणखाण्यावर असता तेथे दोन महिला व काही पुरुष आपत्तीजनक अवस्थेत मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 65 हजार 930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी हॉटेल साईकृपा लॉजिंग अँड बोर्डिंग चालवणारा निलेश सुभाष पवार रा. जातवा, ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर, रवी काळे, तसेच काउंटर सांभाळणारा शुभम कैलास जंगले रा. चिंचोली ता. फुलब्री व ग्राहक लक्ष्मण राजेश गावंडे रा. वारंगाफाटा ता. कळमनुरी जि. हिंगोली, (ह.मु. रांजणगाव, शेणपुंजी) यांच्या विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गणेश ताठे, पोउपनि. अशोक इंगोले, अशोक जाधव, पोलीस नाईक नवाब शेख, राजाभाऊ कोल्हे, विक्रम वाघ, महिला पोलीस पोलीस हवालदार रेखा चांदे यांनी केली.
