March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.21) – अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना बगल देत सर्वसाधारण वाहनधारकांना वाहतूक नियमात अडवून पैसे वसूल करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात आवाज उठवत एका वाहनधारकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. याला समजावताना वाहतूक पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. हा प्रकार शुक्रवारी (ता.21) रोजी वाळूजच्या ए एस क्लब चौकात घडला.

महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, वाहनचालकांना मार्गदर्शन करणे, क्षमतेपेक्षा अधिक तसेच अवैध प्रवासी वाहतूक रोखणे ही कामे वाहतूक पोलिसांकडून अपेक्षित असताना ए एस क्लब चौकातील वाहतूक सिग्नल वर केवळ वाहने अडवून, सक्तीने पैसे वसूल करण्याचा उद्योग राजरोस सुरू आहे. अशीच शक्तीने वसूली करणाऱ्या पोलिसांचा सामना एका वाहनधारकाला करावा लागला. शुक्रवारी (ता.21) रोजी वाळूजच्या ए एस क्लब चौकात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका वाहनधारकाला या नियमावर अडकवले. त्यामुळे त्याने रस्त्यावरच ठिय्या मांडला. परिणामी त्याची समजूत काढण्यास पोलिसांना चांगली धावपळ करावी लागली. दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *