वाळूजमहानगर, (ता.19) :- गंगापूर पोलिसांचे वाहन पिंजरा) भररस्त्यात पलटी होऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. अपघात रविवारी तारीख 19 रोजी दुपारी झाला. या अपघाताचे कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गंगापूर – वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचा नेवरगाव येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस वाहन (एम एच 20, जात असताना ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारार्थ गंगापूर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला.
