February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.16) – सिडको वाळूज महानगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वाळूज औद्योगिक वसाहतीतील स्टरलाईट कंपनीचे कामगार पोपटराव रसाळ यांना चेंज मेकर अवार्ड 2022 मिळाला आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल (भारती फाउंडेशन) चा या वर्षाचा तसेच भारत देशातील सर्वोच्च अवार्ड “चेंज मेकर अवॉर्ड 2022” स्टरलाईट टेक्नॉलॉजी कंपनीचे, पोपटराव रसाळ यांना मिळाला आहे. भारती एंटरप्राइजेसचे सीईओ सुनील भारती मित्तल व व्हॉइस चेअरमन राकेश भारती मित्तल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण भारती एंटरप्राइजेस, वसंत कुंज, नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. या पुरस्कारामुळे रसाळ यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
“चेंज मेकर अवॉर्ड 2022” हा देशातील सर्वोच्च अवार्ड असून सुवर्णपदक व सन्मान हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. असे पोपटराव रसाळ यांनी सांगितले.

……………..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *