वाळूज महानगर, (ता.5) – पोदार प्रेप स्कूल, वाळूज मध्ये 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेमध्ये गांधीजींचा आणि शास्त्रीजीचा कार्याचा उजाळा देण्यासाठी कलादालनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी पालकांनी त्यांच्या मुलांसोबत “जय जवान जय किसान, वंदे मातरम, करा किंवा मरा अश्या घोषना देत कार्यक्रमाला सुरुवात केली ” साधी राहणी उच्च विचार “मुलांनी त्यांच्या पालकांसोबत गांधीजीचा चष्मा, शास्त्रीजींनी टोपी आणि धोती कशी घालायची अशा अनेक कृती केल्या. हरित क्रांती, दांडी मार्च, बापू की वाटिका असे सुंदर देखावे शाळेत निर्माण केले होते. जेणेकरून मुलांना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसाठी त्यांचे जीवन कसे समर्पित केले. याची माहिती मिळाली. गांधीजीच्या कार्याचा आणि त्यांच्या बलिदान व समर्पण दाखवण्यासाठी शाळेत “गांधीजी के अनेक रूप ” असे कला दालन सुद्धा लावण्यात आले होते. यासाठी शाळेचे प्राचार्य डॉ लुईस रॉड्रीग्ज, मुख्याधापिका मीनाक्षी कडू आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले.