वाळूज महानगर, (ता.28) – पोदार प्रेप वाळूज मध्ये वार्षिक क्रीडा दिन गुरुवारी (ता.26) ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची थिम ” बी अ स्पोर्ट्स विथ जंबो ” ही होती.
यावेळी शाळेचे मैदान आवेश जोश आणि उत्साहाने फुलले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक डॉ. निधी नावंदर यांच्या हस्ते झाली. यावेळी विद्यार्यांनी मार्च पास्ट् ट्रक इव्हेंट, पॅराशूट कवायत, हात रुमाल कवायत, जिम्मॅस्टिकस अशा विविध स्पर्धां व शालेय कवायतीचे सादरीकरण केले. मुलांची कामगिरी पाहून अभिमानी पालक आनंदाने भारावले होते. कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्य डॉ. लुईस रॉड्रिग्ज, मुख्याध्यापिका मिनाक्षी कडू, ऍडमिन ऑफिसर जॉय थॉमस आणि शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहूणांच्या हस्ते सर्व मुलांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी मुलांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून दिले. शाळेच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल त्यानी शाळेच्या मुख्यधापिका मीनाक्षी कडू यांचेही कौतुक केले. क्रीडा दिनाची सांगता वंदे मातरमने झाली.