वाळूजमहानगर, ता. 3 – वेळोवेळी पैशाची मागणी करत 26 वर्षीय नवविवाहितेला शिवीगाळ, मारहाण करुन शारीरीक व मानसिक त्रास दिला. लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासून ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत घडलेल्या या घटने प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात 1 जानेवारी 2025 रोजी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील शिल्पा आकाश चक्रनारायण, (वय-26) हिचं लग्न 17 ऑक्टोंबर 2024 रोजी आकाश चंद्रभान चक्रनारायण रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर याच्याशी जोगेश्वरी ता. गंगापुर जि संभाजीनगर येथे झाले आहे. लग्नामध्ये अंदाजे 1 लाख रुपये व संसारउपयोगी साहीत्य दिले. लग्नानंतर सासरकडील मंडळींनी कार घेण्यासाठी 3 लाख रुपये व लग्नात झालेला आमचा 2 लाख रुपये खर्च द्या. असे म्हणुन शिल्पाला लग्नाच्या दुसऱ्या रोजी घरातुन बाहेर काढून दिले. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी आकाशने शिल्पाला फोन करून :तु जर नांदायला आली नाही, तर मी आत्महत्या करेन’. असे सांगितल्याने ती सासरी गेली. त्यानंतर दोघे पती-पत्नी राजणगांव येथे वेगळी रुम करुन राहु लागले. तेथे सुद्धा तो रोज दारु पिवुन तिला शिवीगाळ व मारहान करायचा. रुमवरुन सुद्धा शिल्पाला घराबाहेर काढून दिले. त्यामुळे ती आईवडीलांकडे गेली असता तो त्याच्या आईला घेवुन तिच्या आईच्या घरी गेला. व लग्नामध्ये तिच्या अंगावर घातलेले दागिने काढून घेतले व हाताचापटाने मारहाण केली. याप्रकरणी शिल्पा चक्रनारायण तिने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात आरोपी आकाश चंद्रभान चक्रनारायण (पती), अनिता चंद्रभान चक्रनारायण (सासु) दोघे रा. जोगेश्वरी, दांडगे (नंदई) रा. शेंद्रा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.