
वाळूजमहानगर, (ता.28) – ईपीएस-95 राष्ट्रीय संघर्ष समितीची बजाजनगर येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीत संपर्कप्रमुख दता वाकडे यांनी 22 जानेवारीला पेंशन धारकांच्या बजाजनगर येथे होणार्या मेळाव्याविषयी माहिती दिली. यावेळी कामगारांच्या पेंशन वाढीसाठी संघर्ष केला जाईल असा निर्धार करण्यात आला.
ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या आदेशानुसार समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याच बैठकीत पुढील कार्यकारिणीही निवडण्यात आली. यात अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष- जगन्नाथ कोळी, मच्छिंद्र पुलावळे, सचिव- चंद्रकांत पाटील, कार्याध्यक्ष- सुदाम भंंडे, कोषाध्यक्ष- सावता अवघडे, संपर्कप्रमुख- दत्ता वाकडे, सहसचिव- अशोक बसुगडे, सह कार्याध्यक्ष- भटूगीर बाबा, सहकोषाध्यक्ष- सदाशिव पाटील, सह संपर्कप्रमुख- कृष्णा पाटील, सह प्रसिद्धी प्रमुख- संजय पलटणे, सहसचिव वाळूज- रामनाथ पवार, सह सचिव रांजणगाव- प्रतापसिंग ठाकूर, संघटक- रमेश शेळके, सह संघटक- गोरखनाथ वेळंजकर, सल्लागार- जनार्धन नवसरे आदीची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
बैठकीत बांबर्डे महाराज, कविता भालेराव, आशा शेळके, अरुण कुलकर्णी, लक्ष्मण शिंदे, तसेच दत्ताभाऊ वाकडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पेन्शनर राजेंद्र फिरोदिया, मधुकर कुलकर्णी, आसाराम कर्पे, भरत महेर, औरंगाबाद ईलेक्ट्रीकलचे पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार लक्ष्मण शिंदे यांनी मानले.
—————-
