वाळुजमहानगर, (ता.25) – आंबेडकरी चळवळीने झपाटलेला नेता, (रिपाइं आठवले गट) जिल्हा सरचिटणीस प्रविण उर्फ आप्पा भिमराव नितनवरे यांचे 12 जानेवारी रोजी अचानक निधन झाले. त्यांच्या शोकसभेचे आयोजन शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता पद्मपाणी बुध्दविहार, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर येथे सर्व पक्षीय, सर्व धर्मीय बांधवांकडून आयोजन केले आहे.
प्रवीण आप्पा नितनवरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सर्व हितचिंतक, उद्योजक, व्यापारी, वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, शासकिय, निमशासकिय सवेतील कर्मचारी, अधिकारी, सर्व बुध्द विहार समितीचे पदाधिकारी, बौध्द उपासक उपासिका, कामगार महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थीनी या सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती व लोकनेते प्रवीण आप्पा नितनवरे प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.