
वाळुज महानगर, (ता. 2) – वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव वडगाव रोडवर असलेल्या जय मल्हार चौकामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती शनिवारी (ता.31 मे) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गरुड झेपचे सुरेश सोनवणे, वडगाव ग्रामपंचायत सरपंच सुनील काळे यांनी सर्वप्रथम अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून अभिवादन केले. या प्रसंगी रामनाथ उत्तम रोरे, योगेश रोरे, पांडुरंग सांगूने, यमराज गिरे, मिथू दगडे, एकनाथ लंगडे, सुनंदा कुडके, माधव केदार या सर्वांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केले.
