
तुर्काबाद, प्रतिनिधी (दि.29) – 2025 हे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती वर्ष आहे. त्यांचा जन्म 31 मे, 1725 रोजी अहमदनगर (पुण्यश्लोक अहिल्याबाईनगर) जिल्ह्यातील चौंडी येथे झाला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडोर येथे मराठा साम्राज्याची महाराणी अहिल्यादेवी यांची प्रतिमा स्थापित केली आहे. राणी अहिल्याबाई यांचे जीवन गरीब, दलित, मागासवर्गीय व उपेक्षित घटकांच्या कल्याणाकरिता संवेदनशील व समर्पित होते.

त्यांची वीरता, उत्तम राज्यकर्ती व संघटक म्हणून केलेले कार्य युवा पिढीस एक आदर्श व प्रेरणादायी आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश अध्यक्ष रवीद्र चव्हाण कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वात दि. 21 मे, 2025 ते 31 मे, 2025 या पंधरवाड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती महाराष्ट्रात साजरी करीत आहोत. 
त्या अनुषंगाने गंगापूर दक्षिण मंडळामध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरिता आमदार प्रशांत बंब आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य कीशोर धनायत, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या मार्गदर्शनाखाली समीती गठीत करण्यात आली आहे.

तुर्काबाद परिसरातील दहेगाव (बंगला) येथे गंगापूर भाजपा तालुका दक्षिण मंडळ अध्यक्ष सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 300 वी जयंती उत्सव मंडळ समितीच्या संयोजकपदी शिलाताई गाढे, सहसंयोजक अरुण सागर, सदस्य अशोक करडे, अप्पासाहेब घुसळे, ज्ञानेश्वर सवई आदींचा समावेश आहे.
