
वाळूजमहानगर, (ता.31) – तिसगाव ग्रामपंचायत सदस्य रेखा कैलास सुर्यवंशी व सामाजिक कार्यकर्त्या कल्पना ज्ञानेश्वर वाघमारे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत दिला जाणारा ग्रामपंचायत स्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार”देऊन गौरविण्यात आले. 
सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम 500 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तिसगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे (अंकल), सरपंच शकुंतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, अरुणा जाधव, प्रविण हाडे, क्रुष्णा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी ए.आर. गायकवाड, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
