February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.15) – पिनकोडकार्टच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे देशव्यापी, समुदाय-आधारित सिटी हब कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रविवारी 11 जानेवारी रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम भारतातील 600 हून अधिक सिटी हब्समध्ये एकाच वेळी झाला. या उपक्रमातून भारताच्या विकसित होत असलेल्या डिजिटल कॉमर्स इकोसिस्टममध्ये कामाची प्रतिष्ठा, शाश्वत उत्पन्न आणि सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

हा राष्ट्रव्यापी सिटी हब कार्यक्रम 17 जानेवारी रोजी होणाऱ्या पिनकोडकार्टच्या ग्रँड सेलपूर्वी प्री-लॉन्च एंगेजमेंट म्हणून आयोजित करण्यात आला होता. सेलपूर्वी व्हर्च्युअल दुकानदार, स्थानिक उद्योजक आणि समुदायातील सदस्यांना एकत्र आणून, पिनकोडकार्ट लोककेंद्रित कॉमर्स इकोसिस्टमचा आपला दृष्टिकोन अधिक मजबूत केला.

या उपक्रमाचे आयोजन पिनकोडकार्टच्या सिटी हब्सद्वारे शहर पातळीवर करण्यात आले. ज्यामुळे स्थानिक सहभाग आणि प्रादेशिक गरजांनुसार संवाद सुनिश्चित झाला. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे हा कार्यक्रम अरुण नाजन आणि गणेश मुंजाजी ढिसले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तंत्रज्ञान-सक्षम कॉमर्स मॉडेलद्वारे नव्या उत्पन्न संधी निर्माण करणे आणि तळागाळातील लोकांना सशक्त बनवणे हा होता.

कार्यक्रमातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशभरातील डिलिव्हरी पार्टनर्ससमोरील आव्हाने—उदा. उत्पन्नाची स्थिरता, कामाची प्रतिष्ठा आणि दीर्घकालीन विकास यावर चर्चा करणे. चर्चांमध्ये केवळ व्यवहाराधारित गिग वर्कपुरते न राहता, व्यक्तींना मूल्यनिर्मितीतील भागीदार मानणारी मॉडेल्स विकसित करण्यावर भर देण्यात आला. सहभागींना “व्हर्च्युअल दुकानदार” या संकल्पनेची ओळख करून देण्यात आली जे स्थानिक पार्टनर्स कोणताही इन्व्हेंटरी जोखीम न घेता डिजिटल स्टोअर्स चालवतात आणि ठराविक डिलिव्हरी शुल्काऐवजी रिटेल मार्जिनद्वारे उत्पन्न मिळवतात. हे मॉडेल डिलिव्हरी पार्टनर्स आणि स्थानिक नागरिकांना मायक्रो-उद्योजक बनण्याची संधी देते तसेच त्यांना त्यांच्या समुदायाशी जोडून ठेवते.

कार्यक्रमात उत्पादक (निर्माते) पिनकोडकार्टशी जोडून आपल्या उत्पादनांची पोहोच 19 हजारहून अधिक पिनकोड्सपर्यंत कशी वाढवू शकतात याची माहिती देण्यात आली. तसेच हायपरलोकल कॉमर्स मजबूत करण्यात सिटी हब्स आणि मिनी हब्सची भूमिका आणि स्थानिक इकोसिस्टममध्ये मूल्यनिर्मितीचे महत्त्व यावरही चर्चा झाली.

या उपक्रमाबाबत बोलताना, पिनकोडकार्ट आणि पिनकोड डाकचे संस्थापक नरेश सैनी म्हणाले की, “हा राष्ट्रव्यापी सिटी हब कार्यक्रम सर्वसमावेशक कॉमर्स इकोसिस्टम उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आमचा भर केवळ वेगवान डिलिव्हरीवर नसून, शाश्वत उत्पन्न संधी, कामाची प्रतिष्ठा आणि प्रत्येक पिनकोडमध्ये व्यक्तींना दीर्घकालीन विकासाच्या संधी देण्यावर आहे.”


एकाच वेळी 600 हून अधिक ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमामुळे सिटी हब आणि मिनी हब मॉडेलची स्केलेबिलिटी तसेच पारंपरिक भूमिकांपलीकडे जाऊन डिजिटल कॉमर्समध्ये सहभागी होण्याबाबत समुदायांमध्ये वाढत असलेली रुची स्पष्ट झाली.

पिनकोडकार्ट भविष्यातही आपल्या सिटी हब्सच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर असे सहभागात्मक कार्यक्रम आयोजित करत राहील, जेणेकरून पिनकोड स्तरावर उद्योजकता मजबूत होईल. आणि लोक भारताच्या डिजिटल रिटेल अर्थव्यवस्थेचे सक्रिय भागीदार बनतील.

                काय आहे पिनकोडकार्ट –
पिनकोडकार्ट हे एक हायब्रिड कॉमर्स मार्केटप्लेस असून भारतातील स्थानिक व्यापार परिवर्तनावर लक्ष केंद्रित करते. कंपनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट भारतातील 19 हजारहून अधिक पिनकोड्समध्ये 5 लाखांपेक्षा जास्त उपजीविका व रोजगार संधी निर्माण करण्याचे आहे. विशेषतः टियर-2, टियर-3 शहरे आणि अर्ध-शहरी भागांमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देत, पिनकोडकॅट स्थानिक उद्योजक आणि उत्पादकांना राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्याची संधी देते.

                पिनकोड डाक म्हणजे काय –
पिनकोड डाक हे पिनकोडकार्टद्वारे चालवलेले लॉजिस्टिक्स एनेबलमेंट प्लॅटफॉर्म आहे. भारतातील हायपरलोकल कॉमर्स मजबूत करणे हा याचा उद्देश आहे. पिनकोड-फर्स्ट दृष्टिकोनावर आधारित, पिनकोडडाक व्हर्च्युअल दुकानदार, सिटी हब्स, मिनी हब्स, विक्रेते आणि उत्पादकांना एकत्र जोडते, जेणेकरून स्थानिक बाजारपेठांमध्ये जलद, स्मार्ट आणि अधिक विश्वासार्ह डिलिव्हरी सुनिश्चित करता येईल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *