
वाळुज महानगर, (ता.24) – भरधाव जाणारी दुचाकी आणि मालवाहू पीकअप यांच्यात जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी 23 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास करमाड जवळ झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, करमाड शेंद्रा एमआयडीसीमधून पिकअप (एम एच 20, जी झेड- 3954) हायवे रोड क्रॉस करत होता. तर दुचाकी (एम एच 21, ए जे -9389) ही करमाडकडून जालनाकडे जात होती. 
मंगळवारी 23 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दुचाकी व पिकअप यांच्यात जोराची धडक झाल्याने अपघात झाला. करमाड येथील आराध्या हॉटेलच्या बाजूला झालेल्या या अपघातामध्ये दुचाकीवरील प्रमोद सुधाकर खंदारकर (वय 30) वर्ष रा. रोशनगाव ता. बदनापूर जि. जालना हा गंभीर जखमी झाला.
अशी माहिती गणेश शिंदे यांनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच करमाड येथे उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधाम 24 तास विनामूल्य सेवा देणारी अंबुलन्स चालक बाळू अंकुश कातखडे यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमी प्रमोद खंदारकर याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
