March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता. 22) – श्रीराम ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था आश्रम च्या वर्धापनदिना निमित्त पिंपरखेडा येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव मंगळवार (ता.22 ते 29) दरम्यान होणार आहे.

संस्थापक अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणाऱ्या या महोत्सवात दैनंदिन कार्यक्रमाबरोबरच काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन रात्री 7 ते 9 हरीकीर्तन सेवा, जागर आदी कार्यक्रम होतील. महोत्सवात हभप स्वामी प्रकाशनंदगीरी महाराज, हभप रमेश महाराज मोरे, हभप विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे, हभप श्रीराम महाराज झिंजुर्के, हभप विष्णुकांत महाराज सोळुंके, हभप गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवारी (ता. 29) सकाळी 10 ते 12 हभप कृष्णाजी महाराज नवले (पैठण) यांचे काल्याचे हरीकीर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *