February 21, 2025

पिंपरखेडा सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश चनघटे तर व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब पाटील शिंदे

पिंपरखेडा सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश चनघटे तर व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब पाटील शिंदे

वाळूज महानगर – पिंपरखेडा विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश कुंडलिक पाटील चनघटे तर व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब लक्ष्मणराव पाटील शिंदे यांची मंगळवारी (ता.23) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
या सोसायटीमध्ये एकूण 13 संचालक मंडळ असून मंगळवारी (ता.23) रोजी पिंपरखेडा येथे सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली.

पिंपरखेडा सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश चनघटे तर व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब पाटील शिंदे

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. एम. चौधरी व सोसायटी सचिव आर. एस. साळुंखे यांची उपस्थिती होती. यावेळी चेअरमनपदी सुरेश पाटील चनघटे तर व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब पाटील शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा सोसायटी संचालक नंदकुमार पाटील गांधीले, जनार्दन चनघटे, श्रीराम इंगळे, भाऊसाहेब सुरासे, सुभाष धनाईत, शिवाजी हांडे, बाळासाहेब चनघटे, भरत चनघटे, पुंजाराम शेलार, विमलबाई विनायक गायकवाड व लताबाई ज्ञानदेव चनघटे यांनी सहभाग नोंदवला. अत्यंत खेळीमेळीत झालेली ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पिंपरखेडा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामकृष्ण गायकवाड, गंगापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विकास पाटील गायकवाड, औरंगाबाद मजूर फेडरेशनचे संचालक मधुकर हांडे, सिताराम चनघटे, आप्पासाहेब शिंदे, बालचंद शिंदे, एकनाथ शिंदे, राम चनघटे, अंकुश शिंदे, कल्याण चनघटे, सखाराम खवले, दिनकर शिंदे, कारभारी खजिनदार, आयुब शेख आदींनी प्रयत्न केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *