February 5, 2026

 

 

वाळूजमहानगर, (ता.15) – रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 65 हजार रुपये किमतीचे मनीमंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले. गुरुवारी (ता.12) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सिडको वाळुज महानगर 1 घडलेल्या या घटनेत प्रकरणी शनिवारी (ता.14) रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रुपाली शिवाजी जाधव वय 39 वर्ष रा. स्वामी समर्थनगर प्लॉट न.23, सिडको महानगर-1 तिसगांव ही महिला गुरुवारी (ता.12) रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास भाडेकरू महिला कोमल मचिंद्र पवारच्या सोबत गल्लीतून पाण्याच्या टाकीच्या रोडने भाजीमंडई मोहटादेवी येथे पायी जात होती. त्याच वेळी समोरून मोटर सायकलवर रॉगसाईडने अंदाजे 25 ते 28 वर्ष वयाचा एक व्यक्ती आला. आणि त्याने महिलेच्या गळ्यातील 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसुत्र ओढून पळून गेला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.14) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *