वाळूज महानगर – पालकांनो सावध रहा, मदरशातून मुलं पळवणारी टोळी सतर्क नागरिकांनी पकडून चोप देत टोळीचा पर्दाफास केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली. मात्र या घटनेला पोलिसांकडून पुष्टी न मिळाल्याने तो व्हिडिओ फेक असल्याचे किंवा जिल्ह्याबाहेरील असल्याचे दिसून येते.
वाळुज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील शेंदूरवादा येथील मदरशातून मुले पळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र मदरशातील नाजिम साहब हे मुलांसोबत उपस्थित होते. त्यामुळे मुलं सुरक्षित राहिले. तसेच ही मुलं पळवणारी टोळी नागरिकांनी पकडून चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे वाळूज परिसरातील पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून पुष्टी नाही –
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओबाबत वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले तसेच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अशी घटना वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठेही घडली नाही. पोलिसांकडून या घटनेला पुष्टी न मिळाल्याने हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक किंवा बाहेरील जिल्ह्याचा असण्याची शक्यता आहे.
व्हाट्सअपवर आला आणि व्हायरल केला –
हा व्हिडिओ आणि त्या संदर्भातील मजकूर व्हाट्सअप ग्रुप वर आला. आणि तो वायरल केला. अशी प्रामाणिक कबुली हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या वाळूज परिसरातील एकाने दिली. मात्र अशी कोणतीही गोष्ट व्हायरल केल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात. हे मला माहिती नव्हते, त्यामुळे ती मी व्हायरल केली. असेही त्याने सांगितले.
सूचनांकडे दुर्लक्ष केल्या जाते –
आज घडीला प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्यामुळे घटना घडामोडीही लवकर समजतात. मात्र या चांगल्या गोष्टी बरोबरच काही वाईट किंवा आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल होत असतात. याबाबत पोलीस प्रशासनाकडून नेहमी आवाहन करण्यात येते की, कोणतीही पोस्ट व्हायरल करण्याअगोदर त्याची खात्री करावी, चुकीची किंवा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर तसेच व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनवर देखील कारवाई होऊ शकते. अशा वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
व्हायरल करू नये –
कोणतीही चुकीची, आक्षेपार्ह किंवा बदनामी करणारी पोस्ट तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नये.
असे आवाहन वाळूज पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सचिन इंगोले व पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी केले आहे.
अशी होती व्हायरल पोष्ट व व्हिडीओ –
शेंदूरवादा तालुका गंगापूर पकड़ने वाले बच्चों को पकड़ के ले जा रहे हैं बच्चों के ऊपर ख्याल रखो सिंदूरवादा में उर्दू मदरसे में बुर्का पहन के आए थे 5 जने रात में और गांव के अंदर 5 जने नाजिम साहब बच्चों के साथ मौजूद थे मदरसे में इसलिए बच्चों को कोई नुकसान नहीं पहुंचा