
वाळुज महानगर, (ता.4 ) – – सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्यात बुडून एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. जिकठाण येथे घडलेली ही घटना शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी भल्या पहाटे 12’05 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिकठाण येथील बबाबाई हरिश्चंद्र खोमणे वय 65 ही वृद्ध महिला शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी भल्या पाहटे 12:05 सुमारास जिकठाण गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये पडली. त्यामुळे ती पाण्यात बुडुन नाका, तोडात पाणी जाऊन बेशुध्द झाली. पोलिसांच्या मदतीने तिला विहिरीतून बाहेर काढून उपचारार्थ कमल घोडके व 108 रुग्णवाहिका (एमएच 20, ई व्ही -6966) चालक राजेश पंडित यांनी प्रथम जिकठाण आरोग्य केंद्र येथे दाखल करुन अधिक उपचारासाठी घाटी दवाखाना अपघात विभाग येथे दाखल केले असता डॉक्टरांनी 1:40 वाजता तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीचे पोलीस हवालदार एम डी सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे करीत आहे.
