
वाळूज महानगर, (ता.3) – पाण्यामध्ये पडलेल्या एका गायीला वाचण्यासाठी केलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यातून मृत्यू झाला. ही घटना गुरु धानोरा येथे सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरु धानोरा येथे एक गाय सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी पाण्यामध्ये पडली. त्या गायीचा जीव वाचवण्यासाठी गेलेला तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक रोहित शिंदे, रोहित भैय्या, शिवाजी तांबे व अमोल शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल केला. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव राजू भानुदास भोसले (वय 23) रा. गुरु धानोरा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर असे आहे.
