March 23, 2026

लिंबे जळगाव येथील हृदय द्रावक घटना


वाळुज महानगर, (ता.2) – दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही ह्रदय द्रावक घटना वाळूज परिसरातील लिंबे जळगाव येथे गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबे जळगाव शिवारातील शेतात राहणाऱ्या कुटूंबातील इमरान इसाक शेख वय 20 वर्षे हा दसऱ्यानिमित्त गुरुवारी का 2 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या टेम्भापुरी धरणाच्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्या सोबत त्याचे कुटुंबातील इम्मु इसाक पठाण वय 10 वर्षे, जैन बाबू पठाण वय 10 वर्षे व घराशेजारील मुलगा गौरव दत्तू तारक वय 10 ही तीन लहान मुले होती. सर्व चौघांचाही ट्रॅक्टर धुताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बुडालेल्या चारही मुलांनी चे मृत्यू देह पाण्याबाहेर काढण्यात आले येऊन त्यांना प्रथम शिवराय टोल नाक्याजवळ सी एस एम एस एस हॉस्पिटल येथे व नंतर घाटी रुग्णालयात रवाना केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे, पोलीस अंमलदार पांडुरंग शेळके, पोलीस अंमलदार स्वप्निल खाकरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या चौघांचाही मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी घाटीत दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *