March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.26) – भूजल पातळी अत्यंत खोलवर गेल्याने पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहे. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तात्पुरती का सोय होईना,

म्हणून शेतकऱ्यांचा कल बोअर घेण्याकडे दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत आहे. गंगथडीचा भाग सोडला तर बहुतांश ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करतानाचे चित्र दिसत आहे.

जनमानसाच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्याही चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होण्याला अद्याप दीड महिन्याचा अवकाश आहे. तोपर्यंत किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून व तात्पुरती पाण्याची व्यवस्था म्हणून बोअर घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *