
वाळूज महानगर, (ता.22) – शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार्या गद्दारांना आसमान दाखविल्याशिवाय शांत बसायचे नाही. असा संकल्प संभाजीनगर पच्छिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेची आढावा बैठकीत पंढरपूर व बजाजनगर येथे बुधवारी (ता.21) रोजी करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी उपस्थितांना आवाहन केले कि, येणार्या निवडणुकांमध्ये पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार्या गद्दारांना आसमान दाखविल्याशिवाय शांत बसायचे नाही. सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी मनाशी गाठ बांधल्यास अशक्य काहीच नाही. असा निर्धार करण्याचे आवाहन यावेळी तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी केले. याप्रसंगी शिवसेना पश्चिम विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपतालुका प्रमुख विष्णु जाधव, माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, उद्योजक कैलास भोकरे, सुभाष साबळे, सचिन राठोड, सुदाम भंडे, महेंद्र खोतकर, पाटोदाचे उपसरपंच कपिंद्र पेरे, उपशहर प्रमुख बिबन सय्यद, विश्वास येवले, नामदेव सागडे विभागप्रमुख गणेश सुर्यवंशी, लखन सलामपुरे, दीपक कानडे, सतीश हिवाळे, संतोष चंदन, मच्छिंद्र झळके, उपविभागप्रमुख अमोल पोटे आदींची उपस्थिती होती.
