March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.1) – कारचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन जणांनी इनोव्हा कारमधून पाठलाग करून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता.28) रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास वाळुज कमळापूर रोडवर घडली होती. अखेर मारहाण करणाऱ्या दोघांवर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील जामा मस्जिदजवळ राहणारा इरफान मुन्नाभाई शेख (38) हा सोमवारी (ता.28) रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील ओअँसीस चौकातून
घरी वाळुज येथे जात असताना कामगार चौका
जवळ त्याच्या कारचा समोरील अंकुश अवताडे व हिरा भुजंग यांच्या ईनोव्हा कारला कट लागला. त्यामुळे त्यांनी पाठलाग केल्याने घाबरलेल्या इरफानने कामगार चौकातून वळण घेत कमळापूर येथील भाजेजावई अन्सार शेख याच्या वाटर
फिल्टरजवळ जावून थांबवला असता पाठलाग करणार्यांनी येऊन इरफान शेख याला जीवे मारण्याच्या हेतूने बेदम मारहाण केली होती. यात इरफान शेख हे गंभीर जखमी झाला होता. या घटनेतील हल्ला करणाऱ्या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. अंकुश औताडे, हिरा भुजंग अशी आरोपींची नावे आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *