वाळूज महानगर, (ता.6) – स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता 1 तास स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गांवातील सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली. तसेच गांवातही स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्रामविकास अधिकारी पी एस पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा पेरे, बेबीबाई पेरे, मीरा जाधव, पूनम गाडेकर, शामल थटवले, मंदा खोकड, सुनिता पेरे, छाया पवार, लक्ष्मण मातकर. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच नितिन पेरे, दत्तू पेरे यांच्यासह गांवकरी उपस्थित होते.