February 5, 2026

वाळुज महानगर – वाळूज महानगरातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श पाटोदा गावासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे व माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गावात सभामंडप व उद्यान साकारले जाणार असून या कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचे उपसरपंच कपिंद्र पेरे यांनी सांगितले. 

पाटोदा ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने नुकतेच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व खासदार संदिपान भुमरे यांच्याकडे गावातील विकास कामासाठी लेखी पाठपुरावा केला होता. अखेर या शिष्टमंडळाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे खा संदिपान भुमरे यांच्याकडून 25/15 योजनेंतर्गत 40 लाख रुपयांच्या निधीतून लवकरच येथील मारुती मंदिर प्रांगणात सभामंडप उभारण्यात येणार आहे. तर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून प्रशस्त उद्यान उभारण्यात येणार असल्याची माहिती पाटोदाचे उपसरपंच कपिंद्र पेरे यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच कल्याण पेरे, चंद्रकांत पेरे, सुनील मातकर, अनिल शहाणे, कृष्णा पेरे, किशोर पेरे आदींची उपस्थिती होती. या विकास कामामुळे गावाच्या सौदर्यात आणखी भर पडणार असून, याबद्दल सरपंच जयश्री किशोर दिवेकर, ग्रा पं सदस्या मंदा खोक़ड, पूनम गाडेकर, मिरा जाधव पुष्पा पेरे, शामल थटवले, बेबी पेरे, छाया पवार, लक्ष्मण मातकर, सुनिता पेरे यांच्यासह गावकर्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *