वाळूज महानगर, (ता 26) – वाळुज ते बिडकीन या दोन औद्योगिक वसाहतीच्या मध्ये असलेल्या पाटोदा गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंगळवारी (ता.25) रोजी करण्यात आले. या रस्त्यामुळे आदर्श पाटोदा गावाचा चेहरा बदलणार आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातील पाटोदा या आदर्श गावाततून जाणाऱ्या व वाळूज ते बिडकीन औद्योगिक वसाहतीला जोडणारा पाटोदा ते गेवराई तांडा या रस्त्याच्या कामास 16 कोटी रुपये मंजूर झाले असून या रस्त्याचे भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंगळवारी (ता.25) रोजी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संदिपान भुमरे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह एमआयडीसीचे मुख्य अभियंता राजेंद्र केंद्रे, कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, उपअभियंता गणेश मुळीकर, सहाय्यक अभियंता भगवान दिपके, अरुण पवार, अजय चेन्ने, तांत्रिक सहाय्यक दिलीप चौथ, राजू मगरे, पाटोदा गावच्या सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्रामविकास अधिकारी पी एस पाटील, ग्रामपंचायत सदस्य बेबीताई पेरे, पूनम गाडेकर, मंदा खोकड, मीरा जाधव, शामल थटवले, लक्ष्मण मातकर, पुष्पा पेरे, सुनिता पेरे, छाया पवार तसेच उद्योजक हनुमान भोंडवे, राजेंद्र जंजाळ, माजी सरपंच कल्याणराव पेरे, बबनराव पेरे, पेरे गुरुजी, मुकुंद गाडेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपसरपंच कपिल पेरे यांनी पाटोदा गावात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार संजय शिरसाट, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनीही समायोजित मार्गदर्शन केले.
