वाळूजमहानगर, ता.6 – पाणवठा वाढवण्यासाठी खाम नदीच्या खोलीकरणाच्या कामाला पाटोदा येथे रविवारी (ता.2) रोजी प्रत्यक्षरित्या सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच जयश्री किशोर दिवेकर, उपसरपंच कपिंद्र कैलास पेरे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा पेरे, पोलीस पाटील लहू मुचक, काकासाहेब पेरे, निलेश पेरे, भारत थटवले, संकेत वैद्य, नागेश गाडेकर, संजय सोनवने, उद्धव पेरे, दिलीप पेरे, रमेश मुचक, सीताराम घुले, शिवाजी जाधव यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट – स्वच्छ व सुंदर होणार नदी –
या खोलीकराणाबरोबर खाम नदीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी अनेक योजना राबवून विविध प्रकारचे झाडे लावण्यात येणार आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी व सुंदर दिसण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूने रस्ते तयार करण्यात येणार आहे. शिवाय नदीपात्राच्या खोलीकरणामुळे पाणवठा वाढणार असल्याने परिसरातील शेतीची सिंचन क्षमताही मोठ्या प्रमाणात होऊन बागायती क्षेत्र वाढणार आहे.