February 5, 2026


वाळूजमहानगर (ता.11) – ग्रामपंचायत पाटोदा येथील दिव्यांग व्यक्तीना निधी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.

वाळूज परिसरातील आदर्शगांव पाटोदा ग्रामपंचायतीने 26 दिव्यांग लाभार्थ्यांना व्यक्तींना ग्रामनिधीतून प्रत्येकी 3 हजार रुपये प्रमाणे 78 हजार रुपयाचा दिव्यांग निधी शुक्रवारी (ता.10) वाटप करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून दिवाळी आधी वाटप करण्यात आला. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *