वाळूजमहानगर, (ता.10) – वाल्मी ते बजाज गेट रोड वरील पाटोदावाडी येथे हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती प्रतिमा पूजन, अभिवादन व मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रभाकर म्हस्के, रत्नाकर शिंदे, दुर्गेश खोकड, मदन महेर, नारायण डांगर, उमेश राजपुत, दुर्गेश राजपुत, चंदन राजपुत, संजय राजपुत, सुनिल राजपुत, विजय राजपुत, तरंग राजपुत, सागर चुगडें, मंगेश राजपुत, पुनम राजपुत, सचिन राजपुत, नितीन राजपुत, दिलीप डांगर, आकाश डांगर, वैभव खनसे यांच्या वाडी येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्गेश खोकड यांनी तर आभार उमेश खोकड यांनी मानले.