February 23, 2025

 

वाळूजमहानगर, ता.15 – मतदार संघातील तरुणांना एमआयडीसीत पुढील पाच वर्षात दोन लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती करून देणार असल्याचे आश्वासन अपक्ष उमेदवार डॉ. सुरेश सोनवणे यांनी मतदारांशी संवाद साधताना शुक्रवारी (ता.15) रोजी दिले.


यावेळी सोनवणे म्हणाले की, तालुक्यात विकास हा दिसत नसून विकासासोबतच रोजगाराची देखील बिकट अवस्था झाली आहे. असंख्य तरुण बेरोजगार असल्यामुळे व्यसनाधीन होत आहेत, मी अनेक कंपनी मालकांशी बोललो आहे ते तरुणांना नोकऱ्या देण्यास सकारात्मक आहे. परंतु आमदारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक कंपनी मालकांकडून हप्ते वसूल केले व दमदाट्या केल्यामुळे अनेक कंपनी मालक हे नाराजगी दर्शवत असल्याचे चित्र मी बघितले आहे. मला आपण पुढील पाच वर्ष आपली सेवा करण्याची संधी द्या. मी दोन लाखांपेक्षा जास्त तरुणांना नोकऱ्या मिळून देतो. यावेळी अपक्ष उमेदवार डॉ. सोनवणे यांनी प्रशांत बंब यांच्यावर टीका करत निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मतदारसंघात फिरून मी विकास केला. अशा भूलथापा देत मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. हीच योग्य वेळ आहे, कोणत्याही भुलथाप्पाना बळी न पडता योग्य चेहऱ्याला मतदान करा. पंधरा वर्षात जे करू शकले नाही ते मी पुढील पाच वर्षात करून दाखवेल. त्याच्या भ्रष्टाचाराचा चिट्ठा माझ्याकडे आहे. योग्य वेळ आली की, ते मी जनतेसमोर मांडेल असे देखील या वेळेस अपक्ष उमेदवार डॉ. सुरेश सोनवणे यांनी सांगितले.
चौकट –
यावेळी डॉ. सुरेश सोनवणे यांनी गंगापूर तालुक्यातील आसेगाव, गवळीशिवरा, शिल्लेगाव, जांभळा, टाकळी, पोटुळ, नारायणपूर, लांजी आदी गावांना भेट देत हजारो मतदारांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *