March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.27) – पाच वर्षीय मुलासोबत 26 वर्षीय नराधमाने अनैसर्गिक कृत्य करून लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सबळ पुरावा हस्तगत करत दोषारोपपत्र दाखल केल्याने मा. न्यायालयाने आरोपीस 40 हजार रुपये दंड तसेच 30 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सोमवारी (ता.18) मार्च रोजी ठोठावली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुसद जिल्हा वाशिम येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलासोबत आरोपी आकाश सुभाष राठोड (वय 26) याने वाळूज परिसरातील बजाजनगर येथे अनैसर्गिक कृत्ये केले होते याप्रकरणी करुणा कमलेश दुबाशी यांनी 6 नोव्हेंबर 2021 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 377 भादंविसह कलम 4, 8 बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 

या गुन्हयाचा पोलिसांनी तपास करत आरोपी आकाश राठोड याच्या विरुध्द सबळ पुरावा हस्तगत करून मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्हयातील आरोपीस मा. अतिरीक्त सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी स्पेशल केसमध्ये मा.न्यायालयाने आरोपी आकाश राठोड यास कलम 377 भादंवि मध्ये 7 वर्ष सक्त मजुरी शिक्षा व 10 हजार रुपये दंड. कलम 4 (2) पोक्सो मध्ये 20 वर्ष सक्त मजुरी व 25 हजार रुपये दंड. कलम 8 पोक्सो मध्ये 3 वर्ष सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा 18 मार्च 2024 रोजी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सपोनि. गौतम वावळे यांनी केला असून त्यांना तपास मदतनीस म्हणून पोअं. विठ्ठल शिंगाडे, राजाभाऊ कोल्हे यांनी मदत केली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोह भाऊसाहेब बोर्ड यांनी कोर्ट कामकाज कामी मदत केली. सरकारी वकील जी.पी.देशपांडे, एस.टी. शिरसाठ, यांनी कामकाज पाहिले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *