February 23, 2025


वाळूजमहानगर ता.16 (बातमीदार) – कोणी तरी अज्ञात आरोपीनी अज्ञात कारणासाठी डोक्यात कोणत्यातरी शस्त्राने मारुन 35 वर्षीय जीप चालकाचा
खून केला. व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह त्याच्याच क्रुझर गाडीत टाकुन गरवारे कंपनी समोरील मोकळ्या जागेत आणुन उभी करुन निघुन गेला. ही घटना सोमवारी ता.15) रोजी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील मंगलमुर्ती कॉलनी रांजणगाव (शेणपुंजी) ता. गंगापूर येथील सुधाकर कुंडलिक ससाने (वय 35) हा रविवारी (ता.13) रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गाडीचे भाडे घेवुन चाललो आहे. असे सांगुन त्याची क्रुझर जीप (एम एच 20,ईवाय -5827) ही घेवुन गेला. तो घरी परत न आल्याने त्याच्या मोबाईलवर फोन केला असता रिंग जात होती. परंतु फोन उचलत नव्हता. शिवाय तो घरी न आल्याने त्याचा व त्याच्या गाडीचा मंगळवारी (ता.15) रोजी दुपारपर्यंत शोध घेतला. परंतु तो मिळुन आला नाही. या प्रकरणी सुभाष कुंडलिक ससाने यांनी दिलेल्या खबरीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.15) रोजी मिसिंग दाखल करण्यात आली.

क्रुझर गाडीत आढळला कुजलेला मृतदेह

वाळुज येथील गरवारे कंपनी समोर बेवारस उभ्या असलेल्या त्याच्याच क्रुजर गाडीचा दरवाजा उघडला असता आतुन दुर्गंध आला व गाडीच्या मधल्या सिटवर पोत्याने झाकलेला इसम दिसुन आला. त्याच्या अंगावरील पोते काढुन पाहीले असता तो सुधाकर ससाणे असल्याचे सुभाष ससाणे यांनी सांगितले. अर्ध नग्न अवस्थेत असलेल्या त्या मृत्तदेहाची पाहणी करता त्याचे डोक्याला जखम होती. त्यामध्ये आळ्या झालेल्या होत्या व तो मयत झालेला होता. तसेच गाडीचे बाजुला खाली एक मोबाईल पडलेला दिसुन आला.

मोबाइल लोकेशनवरुन लागला शोध

पुढील चौकशीसाठी सुधाकर ससाणे याच्या मोबाईलचे लोकेशन सायबर पोलीसांकडून मिळाले. ते लोकेशन गरवारे कंपनीजवळ नगर रोड येथील आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राम तांदळे व खबर देणार सुभाष ससाने हे जात असताना गरवारे कंपनी समोरील मोकळ्या जागेत क्रुजर गाडी उभी दिसली. तेव्हा सुभाष ससाणे यांनी ती गाडी सुधाकर याची असल्याचे ओळखले.

घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव

वाळुज येथील गरवारे कंपनीसमोर क्रुझर गाडीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त उज्वला वनकर, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे संदीप गुरमे, वाळूज ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे गुन्हे शाखेचे एएसआय अजित दगडखैर, पोलीस उपनिरीक्षक रमाकांत पटारे, सय्यद मुजीब आदींसह वाळुज व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी घाटीत दाखल केला. पुढील तपास वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *