February 24, 2025

वाळूजमहानगर (ता.28) :- शेजारीच राहणाऱ्या एका अल्प वयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. व तिच्या बरोबर सुमारे वर्षभर शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गरोदर राहिली. आणि गोंडस मुलीला जन्म दिला. सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आई झाल्याने डॉक्टरांनी पोलिसात खबर दिली. आणि ही घटना उघड झाली. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अपहरण व बलात्काराचा गुन्हा (ता.24) रोजी दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खाटकली गावठाण, पडेगाव रोड बेलापूर ता. श्रीरामपूर जि. नगर येथे शेजारी शेजारी राहणारी अल्पवयीन मुलगी व मुलगा यांच्यात सुत जुळले. त्यानंतर 1 ऑक्टोंबर 2021 रोजी अल्पवयीन मुलाने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. केडगाव ता. दौंड येथे हे दोघे सुमारे तीन ते चार महिने राहिले. त्यानंतर दोघेही वाळूज परिसरातील लिंबे जळगाव येथे आले. तेथे त्यांनी एका वीट भट्टीवर मजुरी काम केले. सुमारे वर्षभर या दोघांनी पती पत्नी सारखे राहुन शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान बुधवारी (ता.23) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे तिच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने तिला उपचारार्थ घाटीत दाखल केले.

आणि प्रकरण उघडकीस आले

घाटीत उपचारार्थ दाखल झालेल्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्यामुळे ती गरोदर असल्याचे उघड झाले. तिचे आधार कार्ड पाहिले असता ती 16 वर्षाची असल्याचे समजले. दरम्यान डॉक्टरांनी ही माहिती वाळूज पोलिसांना कळविल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण बुटे यांनी तात्काळ घाटीत धाव घेत 16 वर्षीय मुलीचा जवाब नोंदवला. त्याच दिवशी तिने गोंडस मुलीला जन्म दिला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.24) रोजी 363 अपहरण व 376 बलात्कार (लैंगिक अत्याचार) असा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात श्रीरामपूर येथे 1 ऑक्टोंबर 2021 रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याने वाळूज पोलिसांनी श्रीरामपूर पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग केले. या प्रकरणातील 16 वर्षीय आई झालेली मुलगी घाटीत उपचार घेत असून अल्पवयीन आरोपी मुलगा तिच्या जवळ आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *