
वाळूजमहानगर (ता.27) -दहावी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन परीक्षार्थी मुलीचा पेपर संपताच तिचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. शनिवारी (ता.25) रोजी घडलेली या घटने प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसात रवीवारी (ता.26) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूजऔद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील जिल्हा परिषद शाळेत सतरा वर्ष सात महिने वय असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिकते. शनिवारी (ता.25) रोजी तिचा दहावी बोर्डाचा शेवटचा पेपर होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास पेपर सुटल्यानंतर या अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी (ता.26) रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
