वाळूजमहानगर, ता.13 – परभणी येथे 10 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ रिपाई व सकल बहुजन समाजाच्या शिष्टमंडळाने व वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण नितनवरे, रमेश दाभाडे, किशोर साळवे, अनिल जाधव, चेतन सोनवणे, अशोक वाहुळ, सतिश महापूरे, नितीन जाधव, प्रफुल पाईकराव, निलेश सोनवणे, आकाश वाघ, दिपक वाघमारे, सुमित वानखेडे, किशोर दांडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.
