February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.7 ) – बजाजनगर येथील पद्मपानी बुद्ध विहार येथे गेल्या 3 महिन्यापासून सुरू असलेल्या वर्षावास या धार्मिक कार्यक्रमाची मंगळवारी 7 रोजी उत्साहात सांगता करण्यात आली. वर्षावास निमित्त या विहारात गेल्या भाद्रपद पोर्णिमा पासून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे दररोज नित्य नेमाने पठन व विश्लेषण करण्यात आले. या वर्षावासाची सांगता आज आश्विन पोर्णिमेच्या पावन पर्व दिनी करण्यात आली.

या निमित आयोजित भव्य कार्यक्रमप्रसंगी मंचावर पू. भिक्खु ग्यानरक्षित थेरो, आयकर विभागाचे अधिकारी संघदीप रोडगे, डॉ.अभय पंडित, सविता गायकवाड, विहाराचे संस्थापक अध्यक्ष एल एल गायकवाड आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी भिक्खु ग्यानरक्षित यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहनानंतर भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी विहारात फूलांची विलोभनिय सजावट करण्यात आली होती. भिक्खू ग्यानरक्षित थेरो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास रामटेके यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी सिद्धार्थ दीपके, युवराज ओव्हळ, एल ए काम्बले, यमुना मगरे, काशीबाई ओव्हळ, ज्योत्स्ना इंगळे, सुनीता पहुरकर, वंदना दहिहंडे, ज्योति बगाटे, वंदना कांबळे, सविता आवळे, माया इंगोले, वंदना भालशंकर, रुक्मिणी पवार, ज्योती साळवे, रोहिणी होळकर, सविता पठारे यांच्यासह पद्मपाणी बुद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी आणि उपासक, उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
————–

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *