
वाळूजमहानगर, (ता.17) – पद्मपाणी बुध्द विहार, बजाजनगर येथे प्रतिमा पूजन, अभिवादन, मार्गदर्शन, भोजनदान व भव्य मिरवणूक अशा विविध कार्यक्रमाने बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात प्रथम सकाळच्या सत्रात शासकीय तंत्रनिकेतनचे सहसंचालक उमेश नागदेवे, राष्टीय अत्याचार निवारण समीतीचे प्रा.संजय सोनकांबळे यांच्या उपस्थितीत धम्म ध्वजारोहण झाले. नंतर तथागत बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. 
यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सोनकांबळे नागदेवी आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल.एल.गायकवाड यांनी, विकास रामटेके यांनी सुत्रसंचालन तर एम.एस.ओव्हाळ सर यांनी आभार मानले. भोजनदानाने पहिल्या सत्राची सांगता झाली. दुपारच्या सत्रात सायंकाळी कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या असते मिरवणुकी सुरुवात झाली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा, भव्य सजीव देखावा, डीजीटल स्कीन, लेझीम पथक हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. 
याप्रसंगी पद्मपाणी बुध्द विहारातील कमीटी जयंती उत्सव अध्यक्ष सुभाष कोसरे, उपाध्यक्ष सुंगध, शेषराव जोगदंडे, भाउसाहेब खंडागळे, हीरामन अहीरे, काकासाहेब पवार, एस.पी.हीवराळे, सिध्दार्थ दिपके, विजय देहाडे, विकास रामटेके व संस्थापक अध्यक्ष एल.एल.गायकवाड, व्ही.डी.कांबळे, एम.एस.ओव्हाळ, एल.ए.कांबळे, यु.के.मोरे उपस्थित होते.
