March 25, 2026

वाळूजमहानगर, ता.19 – 8 मार्च जागतिक महिला दिनाप्रमाणेच जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबरला असतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र वाळूज परिसरातील पत्नी पीडित आश्रमात जागतिक दिन दरवर्षी नित्यनेमाने साजरा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला.

यावेळी पत्नी पिडीत पुरुष आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. भारत फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सदस्य वैभव घोळवे, एकनाथ राठोड, संजय भांड, संदीप सातपुते, कारभारी कुक्लारे, अमोल हातकंगणे, विशाल नांदेडकर, प्रवीण कांबळे, हर्षवर्धन दिवे व इतर पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते.

प्रतिक्रिया –
पुरुष हा केवळ करता म्हणून काम करत राहतो. राबराब राबतो. परंतु त्याच्या व्यथा कुणी ऐकून घेत नाही व सांगण्याची सोय देखील नाही, महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्याचा सर्वांकडून उदो उदो होतो. पुरुषांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्याची कुणी दाखल देखील घेत नाही. समाज समजून घेत नाही, पोलीस दाखल घेत नाही, न्याय व्यवस्था देखील पुरुष अत्याचारावर गप्प बसते. हे सर्व उलटे सुरु झाले म्हणून आम्ही 19 नोव्हेंबर रोजी पत्नी पुरुष आश्रम येथे स्वतःस उलटे करून घेतो. शासन सरळ उभे राहून दखल घेत नाही म्हणून आम्ही उलटे होऊन शीर्षासन करत पुरुष दिन साजरा केला……पत्नी पिडीत पुरुष आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. भारत फुलारे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *