March 25, 2026

वाळूज महानगर (ता.8) – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पत्नीवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी मुलगा व शेजारील इसम यांनी मध्यस्थी केल्याने या हल्ल्यात सुदेवाने पत्नी बचावली. मात्र मध्यस्थी करणारे दोघेही जखमी झाले. ही घटना बजाजनगर येथे शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डौर, ता. भोकर, जि. नांदेड येथील गौरव बोईनवाड व त्याची आई हे दोघे बजाजनगर येथील गणपती मंदिराजवळ मल्लिकार्जुन तपसाळे यांच्या घरात किरायाणे राहतात. गौरव हा शिक्षण घेतो तर त्याची आई कंपनीत जाते. त्याचे वडील दर्शन विठ्ठल बोईनवाड हे दारूच्या व्यसनामुळे कधी गावाकडे तर कधी कुटुंबाकडे राहतात. शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास दर्शन बोईनवाड हा दारूच्या नशेन बजाजनगर येथील घरी आला. त्यानंतर त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तीला शिवीगाळ करत चाकू मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती आरोडल्याने गौरव व शेजारी राहणारे वसंत दातार हे आले. ते पतीपत्नीचे भांडण सोडवित असतांना गौरव व वसंत दातार यांना चाकु लागल्याने दोघेही जखमी झाले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *