वाळूजमहानगर, ता.23 – चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या 25 वर्षीय आरोपीविरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध करून वाळुज एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला जन्मठेपेची व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी (ता.20) रोजी सुनावण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आनंद सुरेश लोखंडे (वय 25) हा पत्नी ममता आनंद लोखंडे, त्यांचा एक मुलगा, एक मुलगी व आईवडिलासह मुकुंदवाडी येथे राहत होता. तेथे एका मुलासोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे माहिती झाले. त्यानंतर तिला समजावून सुध्दा तिच्या वागण्यात बदल झाला नाही. म्हणून ते
वाळूज परिसराततील पवननगर, रांजणगांव (शे.पु.) येथे राहण्यास आले. तरीसुध्दा ममता हिच्या वागण्यात बदल न झाल्याने 20 जुलै 2019 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घरी कोणी नसतांना ममताचा गळा दाबून खून केला. व त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 302 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा तपास तात्कालीन पोउपनि. विठ्ठल चास्कर यांनी करून आरोपी विरुध्द सबळ पुरावे उपलब्ध करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुरावे हस्तगत केले. तसेच घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवून जिल्हा व सत्र न्यायालय वैजापूर येथे आरोपी विरुध्द दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणात तदर्थ न्यायाधीश क्र.1 श्रीमती उपाध्याय मँडम कोर्ट वैजापूर यांनी गुन्ह्याचे तपास अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आरोपीची केलेल्या तपासणीवरून उपलब्ध झालेले पुरावे, तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब ग्राह्य धरून आरोपी आनंद सुरेश लोखंडे याला जन्मठेप व 3 हजार रुपये दंडाची शिक्षा 20 जानेवारी 2025 रोजी सुनावली.
या अतिसंवेधनशील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक विठ्ठल चास्कर यांनी केला असून त्यांना तपास कामी तसेच अतिसंवेधनशिल खटल्याचे कामकाज सरकारी वकील एन एस जगताप यांनी कामकाज पाहिले असून त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी सफौ. दत्ता गवळी यांनी मदत केली. आरोपी तर्फे ए.ए. बांगर वकील यांनी कामकाज पाहिले. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान कोर्ट पैरवी अंमलदार यांना वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वरा गाडे यांनी मार्गदर्शन केले.