वाळूजमहानगर, (ता.6) – पती बाहेर गेल्यानंतर कोणाशी तरी सतत बोलुन आपली व कुुटूंबाची समाजात बदनामी होत असल्याने, वांरवार समजावून सुध्दा पत्नीच्या वागण्यात बदल न होता उलट हुंडा बळीची केस दाखल करण्याची धमकी दिल्याने एका इसमाने टोकांचं पाऊल उचलून घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पत्नीसह सासु,सासरे दोन साले अशा पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जोगेश्वरी येथील एका मुलीचे लग्न औरंगाबाद येथील विनोद ससाने याच्याशी झाले होते. ती सासरी औरंगाबाद येथे एकत्र राहत असताना तिने वेळोवेळी भांडण तंटा करून जोगेश्वरी येथे पतीसह आई-वडिलांकडे संसार मांडला. तो जोगेश्वरी येथून पैठण रोडवरील एका कपंनीत दररोज ये जा करीत होता. दरम्यान विनोदला वेळ मिळताच तो पत्नीला फोन करत होता. मात्र तीचा मोबाईल नेहमी व्यस्त राहत होता. वारंवार फोन करून सुध्दा ती फोनवरच कोणाशी तरी बोलत असे. याचा जाब विचारल्याने विनोद व तिच्यात नेहमी वाद होत होता. या प्रकारामुळे विनोद यांची समाजात बदनामी होत असल्याने विनोदने हा सर्व प्रकार सासु, सासरे, दोन साले यांना सांगितला. मात्र त्यांनीही तिचीच बाजू घेत विनोद यालाच धमकावत हुंडा बळीची केस करण्याची धमकी दिली. त्यामुळे तो तनावाखाली होता. याच तणावातुन त्याने 23 मार्च 2022 रोजी मोबाईल मध्ये व्हिडीओ करून राहत्या घरात आत्महत्या केली होती. शिवाय एक चिठ्ठी ही लिहून ठेवली होती. या प्रकरणी विनोदचा भाऊ संतोष ससाने यांच्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी, सासु, सासरे, दोन साले यांच्या विरूध्द तब्बल 9 महिण्यांनी म्हणजेच गुरुवारी (ता.5) जानेवारी 2023 रोजी आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
