वाळूजमहानगर, ता.18 – पतीने पत्नीस मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पत्नीच्या नातेवाईकासोबत वाद झाल्याने पती व त्याच्या वडीलास शिवीगाळ व मारहाण करून जखमी केले. शुक्रवारी (ता.17) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तुर्काबाद (खराडी) येथील शेतात झालेल्या या मारहाणी प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तुर्काबाद (खराडी) येथील याकूब हुसेन शेख (वय 70) व त्यांचा मुलगा हे शुक्रवारी (ता.17) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेतात असताना त्यांचे नातेवाईक शिरीनची आई नाझेरा, मुस्ताक, समीर, अस्लम असे तेथे आले. व म्हणाले की, तुम्ही आमच्या मुलीस शिरिन हीला नेहमी मारहाण का करता? असा जाब विचारत संगणमत करून अलीम शेख व याकूब हुसेन शेख यांना शिवीगाळ करत हाताचापटाने, लाथाने, डोक्यात तसेच छातीवर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी याकूब शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुस्ताक लतीफ शेख (वय 35) रा. लाखेगाव ता. पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर, समीर शब्बीर पठाण (वय 21) रा. लाखेगाव, असलम नसीर शेख (वय 22) रा. गदाना ता. खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजी नगर व नजेरा शब्बीर पठाण (वय 45) राहणार लाखेगाव यांच्याविरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 118(1), 115(2), 352, 3(5) भारतीय न्याय संहिता-2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दशरथ खोसरे करीत आहे.