March 23, 2026


वाळूजमहानगर (ता.07) – पती व जाऊ यांचे अनैतिक संबंध पाहिल्याने वीस वर्षीय विवाहितेचा पती, जाऊ, सासू व भाया यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्याच कारणीभूत ठरलेल्या सासरकडील चौघांविरुद्ध मंगळवारी (ता.7) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जालना येथील अर्चना चंदू पनबीसरे यांची मुलगी देविका हिचा विवाह सिडको वाळूज महानगर येथील लखन देवचंद सूर्यवंशी यांच्याबरोबर 8 मे 2021 रोजी झाला होता. तेव्हापासून देविका, तिचा पती लखन सूर्यवंशी, सासू भागाबाई, जाऊ करिष्मा व भाया किशन सूर्यवंशी हे एकत्र सिडको वाळूज महानगर -1 येथील सूर्यवंशीनगरात राहत होते. सुमारे दोन महिन्यापूर्वी देविका हिने तिचा पती लखन व जाऊ करिष्मा या दोघांना नको त्या अवस्थेत एकमेकांसोबत झोपलेले पाहिले. त्यामुळे देविका हिने त्यांच्या या अनैतिक संबंधाबाबत विचारले असता पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच करिश्माला मी सोडू शकत नाही. आणि तू कधी याबाबत कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली.

त्यानंतर देविका हिने सासू भागाबाईला ही घटना सांगितली असता तिनेही याबाबत कोणाला सांगू नको, नाहीतर तुला तुझ्या माहेरी पाठवून देईन. अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार देविका हिने माहेरी सांगितला. तेव्हापासून तिचा सासरच्या मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ होत होता. या छळाला कंटाळून देविका हिने सोमवारी (ता.6) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कमलसिंग सूर्यवंशी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या या आत्महत्येस पती लखन सूर्यवंशी, जाऊ करिष्मा, सासू भागाबाई व भाया किशन सूर्यवंशी हेच जबाबदार असल्याचा आरोप करत देविकाची आई अर्चना चंदू पनबीसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सासरकडील चौघांविरुद्ध कलम 306, 323, 504, 506, 34 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *