
वाळुज महानगर, (ता.5 ) – आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या वारीला गेलेल्या, पोळ रांजणगाव येथील तरुण वारकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे 5 जुलै रोजी पहाटे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोळ रांजणगाव येथील माणिक रंगनाथ कुऱ्हाडे (वय 32) हा अविवाहित तरुण आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे गहिनीनाथ गडाच्या दिंडीत गेला होता. शुक्रवारी 5 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर माणिक कुऱ्हाडे याला हार्ट अटॅकचा झटका आला. त्यात तो गत झाला. तो अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई भीमाबाई, दोन भाऊ दत्तू व बद्रीनाथ असा परिवार आहे. त्याचा अंत्यविधी पोळ रांजणगाव येथे शुक्रवारी 5 जून रोजी सायंकाळी करण्यात आला.
