
वाळुज महानगर – पंढरपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेर ए हिंद टिपू सुलतान यांची जयंती गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वैशाली बाळासाहेब राऊत होत्या.
प्रथम सरपंच वैशाली राऊत व रेश्मा अख्तर शेख यांच्या हस्ते टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शेख अख्तर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य शमीमबी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य समीर शेख, जावेद शेख, राजू उबाळे, आमेरखा पठाण, विठ्ठल सोनवणे, मेहबूब चौधरी, सारिका खोतकर, मीराबाई गिरे, छाया खोतकर, आशा भोळे, अलका गायकवाड, छाया गायकवाड, तसलीमबी शेख, ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र खोतकर, माजी सरपंच मेहबूब चौधरी, समीर शेख, शाहबाज चौधरी, सोनू पठाण, रउफ पठाण, जुबेर पठाण, साहेब चौधरी, वजीर बेग, इरशाद शेख, एकनाथ कीर्तीकर, एकनाथ सोनवणे आदींची उपस्थिती होती.
