वाळूज महानगर – वाळूज परिसरातून खरेदी केलेली विदेशी दारू गुजरात राज्यात घेऊन जाणाऱ्या आरोपीस अवैध मद्य विक्री विरोधी पथकाने जेरबंद करून त्याच्या ताब्यातून जवळजवळ अर्ध्या लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
पंढरपूर येथे अवैध मद्य विक्री विरोधी पथक गस्तीवर असतांना आरोपी बिपीन बालगिरी गोस्वामी, (वय 29) ह.मु.डवासंग ता. लालपुर जि. जामनगर मुळपत्ता- वाकनेर, रेल्वेस्टेशन रोड पटेलवाडीच्या पाठीमागे ता. जि. वाकनेर मोरंबी गुजरात राज्य हा जॉन वाईन शॉपकडुन ओयासिस चौक, पंढरपुर कडे येत होता. तो एका पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये विदेशी दारूचा साठा करून बेकायदेशिररित्या चोरटी वाहतुक करतांना अवैध मद्य विक्री विरोधी पथकाने छापा मारला. व त्यास विचारपुस केली असता त्याने सांगितले की, गुजरात राज्यात दारुबंदी असल्याने ही दारु मी गुजरात राज्यामध्ये घेवुन विक्री करण्यासाठी जात आहे. त्यामुळे अवैध मद्य विक्री विरोधी पथकाने त्यांच्या ताब्यातुन
जॉन वाकर रेड लेबल ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की, व्हॅट 69 ब्लेँडेड स्कॉच व्हिस्की, चिवास रेगल एजड 12 इयर्स ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की आदी कंपनीच्या विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या 45 हजार 645 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज येथे दारू बंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त मुख्यालय अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड त्यांचे सहकारी पोलिस नाईक मनोज चव्हाण, सुनिल जाधव, पोलिस अंमलदार परशुराम सोनुने, नितेश सुंदर्डे, अभिजीत गायकवाड, महिला पोलीस अंमलदार आरती कुसाळे यांनी केली आहे.