वाळूजमहानगर – गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या दोन दिवापासुन वाळूज औद्योगिक परिसरात धाडसत्र अवलंबले असून या पथकाने दुसर्या दिवशी पंढरपुर येथून 78 हजार 202 रुपये किमतीचा 6 किलो 301 ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (ता.25) रात्री फुलेनगर, पंढरपूर येथे करण्यात आली.
वाळूज औद्योगिक परिसरात गेल्या काही दिवसापासुन अवैध्य धंदे मोठ्या प्रमाणात फोफावाले आहेत. स्थानिक पोलीसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने शहर गुन्हे शाखेचे पोलीस या परिसरात धाडसत्र राबवित आहे. गेल्या दोन दिवसापासुन गुन्हेशाखेच्या पथकोन वाळूज औद्योगिक परिसरात जाळे टाकून अवैध रिफिलिंगचा अड्डा उध्वस्त करून जवळजवळ सव्वा दोन लाखाचा ऐवज जप्त केला. दुसऱ्या दिवशी गुरूवारी (ता.25) रोजीही गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पंढरपुर येथे गांजा विक्री करणारी महिला संगिता रमेश गिरे (47) रा. फुलेनगर, पंढरपूर हिच्या ताब्यातून रोख रक्कमेसह 78 हजार 202 रुपये किमतीचा 6 किलो 301 ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नशिम खान शब्बीर खान, पोलीस शिपाई सुरेश भिशे, पोलीस अंमलदार धर्मराज गायकवाड, महेश उगले, महिला पोलीस प्राजक्ता वाघमारे, पोलिस चालक डी.एस. दुभळकर यांनी केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.