
वाळूजमहानगर, (ता.5) – पंढरपूर येथील सम्राट अशोक विद्यालयातील रसिका बागडे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तिचे पंढरपूर वळदगाव परिसरातून मोठे कौतुक होत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या एसएससी बोर्ड, दहावीच्या परीक्षेत पंढरपूर येथील सम्राट अशोक विद्यालयातील बागडे रसिका 89.90 टक्के, भुजंग संजना 85,40, लांडे शिवराज 75,80 हे विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. तसेच याच विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये विशेष प्राविज्ञासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जगधने सागर 72.80, शेवाळे वैष्णवी 71.00, शिंदे प्रीती अर्जुन 66.80, शिंदे आकांक्षा 65. 00 आदींचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे सम्राट अशोक विद्यालयात कडून स्वागत करण्यात आले.
